किल्ले हतगडच्या अस्तित्वालाच धोका

दिनांक .८.११.२०१७ शिवकार्य गडकोटचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन.

नाशिक प्रतिनिधि : किल्ले हतगडच्या किल्ल्यांवरिल ऐतिहाशिक वास्तुं,किल्ल्याच्या पायथ्याचे तट,वाड़े व शिवकालीन किल्लेदार गंगाजी उर्फ गोबाजी मोरे देशमुख यांच्या बलिदान व समाधीस्थळाची आत्यंतिक दुरवस्था झाली आहे,या ऐतिहाशिक वास्तुना अतिक्रमनाचा वेढा आहे.यातुन हतगड च्या वाड़े,वास्तुंची झालेली दशा थांबवावी,या किल्ल्यांचे शिवकलिन किल्लेदारांचे वंशजांच्या पुरातन दस्ताऐवज बघता त्यांच्या अधिकार व मार्गदर्शनाखाली येथील इतिहासाच्या पाउलखुना जतन संवर्धन कराव्या अशी मागणी गड़किल्ले संवर्धन कार्यात झटणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री मोहोदयांच्या नावे दिलेल्या निवेदनातून करन्यात आली.हे निवेदन नाशिकचे उपजिल्हाधिकारी रामदास खेडेकर यांना सुपुर्द करण्यात आले.यावेळी ह्या विषयाचे गम्भीरहय बघून जिल्हाधिकारी यांना भेटून या विषयाची कार्यवाही करू असा शब्द ही त्यांनी दिला.

निवेदनात उल्लेख केल्याप्रमाने किल्ले हतगडच्या माथ्यावरिल वास्तुची पड़झड झाली आहे,दुर्लक्षित स्थिति असल्याने ह्या वास्तुना आतून खोदन्याचे प्रकार घडले आहेत,किल्ल्याच्या ऐकून महितीनुसार किल्ल्याच्या पायथ्याशी जूने वाड़े आज पूर्ण जमींदोस्त आहे,तर किल्लेदारांचे बलिदान ठिकान नावालाच उरले आसून समाधी जिर्णोधाराच्या प्रतिक्षेत व अतिक्रमनाच्या विलख्यात आहे,एकीकडे वन विभाग कोटयावधि रूपयाची कामे करीत आहे,यात रस्ते,सीमेंट  पायऱ्या,रोलिंग ईत्यादि कामे सुरु आहेत, मात्र हतगड च्या पायथ्याशी मोठमोठ्या इमारती उभ्या होत असताना मात्र येथील ऐतिहाशिक ठेवा संपुष्टात आला आहे,शासनाने याची दखल घेवून प्रत्यक्ष पाहणी करुण किल्ल्याचा इतिहास वाचवावा,शिवकालीन किल्लेदार गंगाजी मोरे देशमुख यांच्या वंशजांच्या जागा त्यांना दयाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी हतगड च्या शिवकालीन किल्लेदारांचे १४ वे वंशज मनोहर हणमंत मोरे देशमुख यांचेसह शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,प्रा.सोमनाथ मुठाळ, सल्लागार संदीप भानोसे,आर आर कुलकर्णी,जेष्ठ पत्रकार विकास देशपांडे,शाम कुलथे,गणेश सोनवणे,यावेळी उपस्थित होते.

फोटो:  किल्ले हतगड़ च्या दुर्दशे बाबत निवेदन देताना किल्ले हतगडचे किल्लेदारांचे वंशज मनोहर मोरे देशमुख,जेष्ठ पत्रकार विकास देशपांडे,शिवकार्य गडकोटचे संस्थापक राम खुर्दळ,प्रा.सोमनाथ घुले,डॉ.संदीप भानोसे,आर आर कुलकर्णी,गणेश सोनवने ई.
राम खुर्दळ ,संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था.नाशिक,मो. 9423055801


त्रिपुरारी पौर्णिमेला नाशिकचा शिवपुतळा परिसर लक्ष्य दिव्यांनी झळाळला

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा उपक्रम.

नाशिक प्रतिनिधी : शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकच्या सी.बी.एस.जवळच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेला (दि.५ नोव्हेंबर २०१७) दीपोत्सव मोठ्या उत्साहात झाला.या वेळी लक्ष्य दिव्यांनी शिवपुतळा परिसर झळाळून उठला होता. “ छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे,नष्ट होत असलेला किल्ल्यांचा वारसा जतन व्हावा या संदेशासाठी शिवकार्यच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.या वेळी संस्थेच्या प्रत्येक गडकोट संवर्धकानी आपल्या घरून दिवे आणले होते.हजारो दिव्यांच्या वाती पेटवून “किल्ले वाचवा महाराष्ट्राचा इतिहास वाचवा” अश्या घोषणा देवून दीपोत्सव उत्साहात झाला.या वेळी दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यांच्या कार्याबद्दल संस्थेचे सल्लागार संदीप भानोसे यांनी मनोगत व्यक्त केले. “किल्ल्यांचे संवर्धन कार्य हीच मांडे दादांना श्रद्धांजली” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.यावेळी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे निमंत्रक प्रा.सोमनाथ मुठाळ,संयोजक योगेश कापसे,मानद सल्लागार डॉ.संदीप भानोसे,शाम कुलथे,शिवकालीन साहित्य संग्राहक कचरू वैद्य,पवन माळवे,जेष्ठ पत्रकार सुरेश भोर,प्रहार संघटनेचे दत्तू बोडके,अनिल भडांगे,हर्शल पवार,रुणेश कन्सारा,मनोज अहिरे,गजानन दिपके,हार्दिक निगळ,सिद्धांत काळे,संकेत भानोसे,संतोष इटनारे,यांचे सह बाल दुर्गसंवर्धक प्रथमेश दिपके, दिव्यांग बांधव चेतन रत्नपारखी यावेळी सहभागी झाले होते.

फोटो; शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेवतिने नाशिक ला त्रिपुरारी पौर्णिमेला शिवरायांच्या पुतळ्या समोर दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित गडकोट संवर्धक.

राम खुर्दळ.संस्थापक शिवकार्य गडकोट संस्था.९४२३०५५८०१.


देशा विदेशातील ५१४ गडकोटांची भ्रमंती,आग्रा ते राजगड पायी प्रवास शास्वत स्मृती व प्रेरणाच

दुर्गजागृती व्याख्यानमालेत नाशिकला अॅड.मारुती गोळे यांनी मांडला आग्रा ते राजगड पायी प्रवासाचा अनुभव.

नाशिक प्रतिनिधी: सह्याद्रीचे गडकोट हे माझ्यासाठी स्वर्गच आहे.छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे पायदळ प्रमुख आमचे पूर्वज नरवीर पिलाजी गोळे यांच्या घराण्यातील मी युवक,घराण्याची परंपरा,संस्कार अंगभूत व ओतप्रोत आहे.मातीतला मल्ल असलो,तरी छत्रपती शिवरायांची गडकोटांची भूमी असलेला सह्याद्री माझ्यासाठी,माझ्या गडकिल्ल्यांच्या पायी भटकंतीसाठी माझ्यासाठी साक्षात स्वर्गच आहे.देशाविदेशातील गडकोट फिरताना महाराष्ट्रातील गडकोटांची सर कोन्हाला येणार नाही,अभेद्द राजगड इतक मोठ गतवैभव आपल्या भूमीत आहे आपण सगळे भाग्यवान आहोत,आता आपण डोळस होऊ या,इथल्या उत्सवी तरुणांनी आता गडकोटांच्या संवर्धनासाठी झोकून दिले पाहिजे.आपल्या भूमीचा तसा इतिहासच आहे.आग्र्याहून राजगडकडे निघताना रस्त्यात एक मराठी माणूस म्हणून उत्तर भारतीयांनी केलेला सत्कार,सन्मान अविस्मरणीय आहे.आग्रा ते राजगड १२५३ किलोमीटर पायी मैलोमैल चालताना ३५ दिवसात आलेले अनुभव माझ्यासाठी प्रेरणाच आहे,या पुढे हि भारतातील सर्वच गडकोट भ्रमंती करण्याचा संकल्प असल्याचे मनोगत नाशिकच्या दुर्गजागृती व्याख्यानमालेच्या १९ व्या पुष्पात अॅड.मारुती गोळे यांनी मांडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ.गिरीश टकले होते.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व वैनतेय गिरीभ्रमण संस्थेच्या माध्यमातून नाशिकच्या शरणपूररोड वरील “वैराज कलादालन”येथे दुर्गजागृती व्याख्यानमालेचे १९ वे पुष्प झाले. छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेला ३५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आग्रा ते राजगड अशी पायी प्रवास पूर्ण केला.तसेच देशा विदेशातील ५१४ गडकोट भ्रमंती केली.या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे पायदळ प्रमुख नरवीर पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज अॅड.मारुती गोळे यांचा शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व वैनतेय गिरीभ्रमण संस्थेवतीने जाहीर गौरव सन्मान करण्यात आला .त्यांना मोडी लिपीतील सन्मानपत्र,स्मृतीचीन्ह,फेटा,शाल,श्रीफळ,पुस्तक भेट देवून यथोचित सन्मान करण्यात आला. त्या नंतर अॅड.मारुती गोळे यांची गडकोट भ्रमंती पायी प्रवासाबद्दल वैनतेय संस्थेचे सुदर्शन कुलथे व शिवकार्य गडकोट चे कोषाध्यक्ष डॉ.अजय कापडणीस यांनी जाहीर मुलाखत घेतली.तत्पूर्वी इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी छत्रपती शिवरायांच्या आग्राभेटी बद्दल अभ्यासात्मक मांडणी केली.शिवरायांची सुटका,त्यांचा प्रवास,कालमर्यादा,प्रसंग याबद्दल सविस्तर मांडणी केली.अनेक दाखले देवून शिवरायांच्या,शंभूराजांच्या व सोबत असलेल्या सहकारर्यांच्या सुटकेचे  अनेक प्रसंग उलगडून सांगितले. त्यानंतर अॅड.मारुती गोळे यांच्या जाहीर मुलाखतीत त्यांना शारीरिक फिटनेस,घरघुती सहकार्य,गडकोटांची आवड,स्थिती,आग्रा ते राजगड दरम्यान पायी प्रवासातील अनुभव,गडकिल्ल्यांची सध्यस्थिती,आजच्या युवकांकडून अपेक्षा,इतिहासातील सुभेदार,किल्लेदारांचे वंशज,त्यांची स्थिती, याबद्दल अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले.या प्रश्नाला आपल्या रांगड्या भाषेत उत्तर देतांना अॅड.मारुती गोळे यांनी प्रश्नाला उत्तरे देताना सांगितले कि, घराण्याची कारकीर्दच आम्हाला पायी प्रवासाची परंपरा शिकवते हाच वसा आम्ही अंगिकारला आणि गडकिल्ले भटकंती,आग्रा ते राजगड प्रवास पूर्ण केला.परदेशातील गडकिल्ले आजच्या स्थितीत टिकवले आहेत.मात्र आपल्या मातीतील गडकोट आज च्या स्थितीत अत्यंत दुरवस्थेत आहे.याकडे सरकारचे दुर्लक्ष्य तर आहेच पण समाजातून हि दुर्लक्षच आहे, किल्ले राजगड सारखे अभेद्द वैभव त्याचे हि संवर्धन समाधानकारक नाही.हा वारसा वाचवण्यासाठी कार्यरत शिवकार्य गडकोट सारख्या मोहिमा संस्थाना समाजाने हात दिला पाहिजे,तरुणांनी व्यसन व खर्चिक उत्सवांत उधळपट्टी थांबवून गडकिल्ल्यांच्या अस्तित्वासाठी आता कष्ट केले पाहिजे,अन्यथा गडकोट चित्रांत राहतील अशी स्थिती आहे.आता सर्वांनी या कार्याला सहभागी झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमांत पुणे येथील भारत पाटील,जेष्ठ इतिहास अभ्यासक गिरीशजी टकले,सरकारवाडा संवर्धनासाठी अविरत झटणारे अन्ना बेळे,माजी पोलीस उपयुक्त लेखक अभिमन्यू सूर्यवंशी,इतिहास अभ्यासक लेखक व्ही.पी.बिरारी,अॅड दत्ता निकम,सल्लागार विजय निकम,दुर्गभ्रमंतीकार दिलीप गीते, सुदर्शन कुलथे,इतिहास अभ्यासक रामनाथ रावळ,मावळा प्रतिष्टान चे बजरंग पवार,महेंद्र कुलकर्णी, संयोजक योगेश कापसे,गिरीभ्रमंतीकार डॉ.जोशी, शिवकार्यचे निमंत्रक प्रा.सोमनाथ मुठाळ,मानद सल्लागार डॉ.संदीप भानोसे, नेचर क्लबचे आनंद बोरा, प्रमोद पवार,कृष्णकांत विसपुते,नंदकुमार कापसे,डॉ.भारत ब्राह्म्हने,आर आर कुलकर्णी,गणेश सोनवणे,राजेंद्र कट्यारे,अविनाश क्षीरसागर,पवन माळवे,प्रीतम भामरे,योगेश्वर कोठावदे,राहुल भोसले,कचरू वैद्य,इतिहास शस्र संग्राहक आनंद ठाकूर,गजानन दिपके,सुयोग बागुल,संतोष इथनारे,यासह गिरीभ्रमण, व दुर्ग संवर्धन क्षेत्रातील अनेकजन या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम खुर्दळ यांनी, अॅड.मारुती गोळे यांची मुलाखत सुदर्शन कुलथे व डॉ.अजय कापडणीस यांनी,सूत्रसंचालन योगेश कापसे,पाहुण्याची ओळख डॉ.संदीप भानोसे,५३ व्या मोहिमेची माहिती गणेश सोनवणे यांनी तर आभार प्रा.सोमनाथ मुठाळ यांनी मांडले.

फोटो:  शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व वैनतेय गिरीभ्रमण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दुर्गजागृत्ती व्याख्यानमालेत नाशिकच्या वैराज कलादालनात झालेल्या कार्यक्रमात स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख पिलाजीराव गोळे यांचे १४ वे वंशज अॅड.मारुती गोळे यांनी शिवरायांच्या आग्रा भेटीला ३५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल”आग्रा ते राजगड” पायी प्रवास पूर्ण केला.तसेच महाराष्ट्रातील ५१४ गडकोटांची भ्रमंती पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल,पुस्तक,लखोटा,फेटा,पुष्प,श्रीफळ भेट देउन सन्मान करताना जेष्ठ इतिहास अभ्यासक गिरीश टकले,शिवकार्यचे अध्यक्ष राम खुर्दळ,भारत पाटील,प्रा.सोमनाथ मुठाळ, डॉ.संदीप भानोसे.

राम खुर्दळ.संस्थापक.शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था.नाशिक.९४२३०५५८०१

दुर्गजागृत्ती व्याख्यानमालेत १२ ओक्टोंबरला नाशिकला अॅड.मारुती गोळे यांची “आग्रा ते राजगड पायी प्रवास” विषयावर मुलाखत व सत्कार

दि.९ ओक्टोंबर २०१७ : नाशिक प्रतिनिधी: स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख पिलाजीराव गोळे यांचे १४ वे वंशज अॅड.मारुती गोळे यांनी शिवरायांच्या आग्रा भेटीला ३५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल”आग्रा ते राजगड” पायी प्रवास पूर्ण केला.तसेच महाराष्ट्रातील ५१४ गडकोटांची भ्रमंती पूर्ण केली.त्याबद्दल अॅड.मारुती गोळे यांची जाहीर मुलाखत व नाशिककरांच्या वतीने जाहीर सत्कार केला जाणार आहे. येत्या गुरुवार दि.१२ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिकच्या शरणपूररोड कुलकर्णी गार्डन येथील वैराज कलादालनात हा कार्यक्रम होणार असून यावेळी अॅड.मारुती गोळे यांची “आग्रा ते राजगड पायी प्रवास” या अनुभवांवर वैण्यतेय संस्थेचे सुदर्शन कुलथे व शिवकार्य गडकोट संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ.अजय कापडणीस मुलाखत घेणार आहे.यावेळी अॅड.मारुती गोळे यांचा सन्मानपत्र,स्मृतीचीन्ह,शाल,श्रीफळ,पुस्तक देवून समस्त नाशिककरांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ इतिहास अभ्यासक गिरीश टकले असणार आहेत.या कार्यक्रमास मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो : स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख पिलाजीराव गोळे यांचे १४ वे वंशज अॅड.मारुती गोळे यांचा फोटो.
राम खुर्दळ.संस्थापक.शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था.नाशिक जिल्हा.मो.९४२३०५५८०१

ऐतिहासिक अवशेष संपन्न किल्ले चोल्हेरची (तिळवण) सर्व पातळीवर उपेक्षा

राज्य शासनाला पत्र देण्याचा शिवकार्य गडकोट, मावळा प्रतिष्टानचा निर्णय

दि.२५ सप्टेंबर २०१७

नाशिक प्रतिनिधी: सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला अवशेष संपन्न “किल्ले चोल्हेर (तिळवण)”चा ऐतिहाशीक कडा,तटबंदी,कातीव कड्यातील भुयारी मार्ग,त्यात कोरलेले,बांधीव दरवाजे,माथ्यावरील दगडी दरवाजे,सैनिकांचे जोते,व किल्ल्याच्या पूर्वेकडील जलसंपन्न खोदीव टाक्यांचा हा दुर्ग अत्यंत उपेक्षित व पडझडीच्या स्थितीत आहे.नवनाथी महंत चौरंगी बाबांची तपोभूमी म्हणून अध्यात्मिक या किल्ल्याला चोल्हेर किल्ला असे नाव पडले.असा हा दुर्ग वैशिष्ट्यांनी नटलेला चोल्हेर किल्ला महाराष्ट्र शासनाने संवर्धनासाठी घेतलेला आहे.मात्र या किल्ल्याच्या पडझडीच्या अवस्थेत,तग धरून असलेल्या ऐतिहासिक वास्तू बघता किल्ले चोल्हेरला अत्यंत उपेक्षित ठेवण्यात आल्याचे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,व मावळा प्रतिष्टानने याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.याबाबत महाराष्ट्र शासन व समन्धित खात्याला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय गडकोट संवर्धन श्रमदानाच्या वेळी किल्ले चोल्हेरवर (दि.२४ सप्टेंबर २०१७) एकमुखाने घेण्यात आला.

गेल्या ६ वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील गडकिल्ल्यांवर जावून त्या गडकिल्ल्यांचे अभ्यासपूर्ण संवर्धन शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था स्वावलंबनातून सातत्याने करीत आहे.संस्थेच्या वतीने सध्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील गडकोट मोहिमा मावळा प्रतिष्टान या मित्र संस्थेसोबत सुरु आहे.किल्ल्याचे निरीक्षण,वास्तूंची मोजमापे,नकाशे,स्केच,व किल्ल्यावर श्रमदान,पायथ्याच्या गावाशी संवाद अश्या पद्धत्तीने गडकोट संवर्धन कार्य सुरु आहे.यानिमित्ताने पहाटे ६ वाजता मोहिमेला नाशिकच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळा पासून प्रारंभ झाला. शिवकार्य गडकोट संस्थेची ५२ वी गडसंवर्धन मोहीम किल्ले चोल्हेरवर झाली.समुद्र सपाटीपासून ३७३३ फुट उंचीवरील अवघड वाटेच्या किल्ल्यावर चढाई झाल्यावर किल्ल्याच्या कडेला असलेल्या जलाशयांची पाहणी करण्यात आली,किल्ल्यावरील कातीव दगडात असलेल्या ६ दगडी भुयारी दरवाजांची पाहणी,किल्ल्यावरील जलाशयांचे मोजमापे घेण्यात आली.किल्ल्यावरील खडकांत असलेल्या गणपती,व हनुमंताच्या मुर्त्यांना रंग देवून विद्रूप करण्यात आले आहे,तर किल्ल्याच्या दरवाजांवर चुन्याने नको ते लिहून तिथे हि विद्रूप करण्याचा प्रयत्न झाला आहे.किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या दगडी दरवाजांची पडझड झालेली आहे,अत्यंत बांधीव दगडी दरवाजे पडझडीत तग धरून आहे तर जुन्या वाड्यांची,सैनिकांच्या जोते धासलेल्या अवस्थेत झुडपांत,साबरांत लुप्त झाले आहे.किल्ले चोल्हेर (तिळवण)वरील माथ्यावरच्या हिरवेगार पाण्याची टाक्यांच्या आजूबाजूची काटेरी झुडपे काढून,त्याला लागून असलेल्या पाणी वाहण्याच्या नळ्या शोधून स्वच्छ करण्यात आल्या.व टाक्यांतील प्लास्टिक घाण काढण्यात आली.किल्ल्यावरील मंदिरासमोर असलेल्या प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. किल्ल्यावर दिवसभर सुरु असलेल्या श्रमदानानंतर किल्ल्यावर सामुदायिक भोजन करण्यात आले.बागलाणच्या बहिर्जी या बागुल राज्याचे काही काळ या किल्ल्यावर वास्तव होते.कालांतराने मोघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला. श्रमदानानंतर सूर्य मावळतीला किल्ल्यावरून तिळवण गावात गावकऱ्यांशी संवाद साधून किल्ला संवर्धन व स्वच्छता,तसेच पूज्य चौरंगी बाबांची समाधी चा जीर्नोधार करावा अशी विनंती गावाला करण्यात आली.किल्ल्यावरून दिसणारा बालेकिल्ला,घोड्याच्या पागा,खोदीव प्रवेशद्वारे बघून मन थक्क होते,या किल्ल्याची रचना करणाऱ्या पाथरवटांच्या कलाकुसरीला दाद द्यावी ,नमन करावे इतकी अवशेष संपन्न रचना किल्ले चोल्हेर ची आहे.महाराष्ट्र शासनाच्या किल्ले संवर्धन योजनेत या किल्ल्याच्या पायथ्याच्या काही सिमेंट च्या कामकाजाची,व किल्ला चढाईत केलेल्या लोखंडी पाईपच्या संरक्षण आधाराशिवाय येथे कुठलेही गड संवर्धन झालेले दिसले नाहीत.तातडीने चोल्हेर किल्ल्यावरील वास्तूंची डागडुजी करावी,तसेच किल्ल्यावरील ऐतिहासिक अविस्मरणीय वारसा नष्ट होण्यापासून वाचवावा यासाठी राज्यशासनाला पत्रव्यवहार करण्यात येईल अशी माहिती शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी गडकोट संवर्धकांच्या बैठकीत सांगितले. किल्ले चोल्हेर श्रमदान मोहिमेत शिवकार्य गडकोटचे संस्थापक राम खुर्दळ,मावळा प्रतिष्टानचे बजरंग पवार,निमंत्रक प्रा.सोमनाथ मुठाळ,कोषाध्यक्ष डॉ.अजय कापडणीस,जेष्ठ मानद सल्लागार डॉ.संदीप भानोसे,महेंद्र कुलकर्णी,शामराव कुलथे,पर्यावरण मित्र आर.आर.कुलकर्णी,कृष्णकांत विसपुते,गजानन दिपके,डॉ.भरत ब्रांह्म्हने,दिव्यांग दुर्गमित्र सागर बोडके,मनोज अहिरे,श्रीधर ठाकूर,हेमंत भावसार,अविनाश क्षीरसागर,राहुल बोडके,प्रसाद चव्हाण,योगेश जाधव,अतुल जाधव,प्रमोद पवार,आकाश सावकार,गोरख मोहिते,संतोष ईटनारे,नंदकुमार कापसे,सारंग शिंदे,गणेश सोनवणे,संकेत भानोसे,बाल दुर्गसंवर्धक प्रथमेश दिपके,रेणू भानोसे,ललित भावसार यासह अनेक जन या मोहिमेत उपस्थित होते.

किल्ले चोल्हेर श्रमदान मोहिमेत सहभागी शिवकार्य गडकोट व मावळा प्रतिष्टान चे श्रमिक.

किल्ले चोल्हेर वर श्रमदान करताना

किल्ल्यावरील भग्न मुर्त्या

समाधी ची दुरवस्था

राम खुर्दळ, संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, जिल्हा नाशिक ९४२३०५५८०१ 


शिवकार्य गडकोट व मावळा प्रतिष्टानचे मुसळधार पावसात किल्ले पिसोळगडवर श्रमदान

अत्यंत दुर्लक्षित पडझड, वास्तूंचे विद्रुपीकरन बघून गडकोट संवर्धक संतप्त

दि.२८ ऑगष्ट २०१७

नाशिक प्रतिनिधी: शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व मावळा प्रतिष्टान या मित्र संस्थांच्या संयुक्तपणे किल्ले पिसोळगड वर मुसळधार पावसात (रविवार दि.२७ ऑगष्ट २०१७) श्रमदान करण्यात आले.किल्ल्यावरील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या वास्तूंची मोजमापे घेण्यात आली ,माथ्यावरील काटेरी झुडपात,गवतात लुप्त झालेल्या,झाडाच्या पालापाचोळ्यात दडलेल्या कोरीव टाक्याची अभ्यासपूर्ण स्वच्छता करण्यात आली.टाक्यातून काढलेली माती गोळा करण्यात आली.नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील किल्ले पिसोळ हा मोठा ऐतिहाशीक वारसा आहे,किल्ल्यावर  २७ हून अधिक परिपूर्ण जलाशयाचा साठा ,अध्यात्मिक,ऐतिहाशीक वास्तूंचा,अभेद्द तटबंदी,पडझड झालेले खंदक,पूर्वजांच्या पडझड झालेल्या समाध्या,किल्ल्यावर होणाऱ्या अनिष्ट प्रथा,अश्या सर्वच पातळीवर दुर्लक्षित किल्ले पिसोळगडची दैना बघून गडकोट संवर्धकानी तीव्र संताप व्यक्त केला.या किल्ल्याची ढासळनारी स्थिती बघता किल्ल्याची तातडीने दुरुस्ती हाती घ्यावी असी मागणी करण्यात येणार आहे.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या ५२ व्या गडसंवर्धन मोहिमेचे प्रस्थान नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा येथून पहाटे ६ वाजता झाले. सह्याद्रीच्या सालबारी पर्वत रांगेत किल्ला पिसोळगड आहे.या किल्ल्यावर अभिर आहिर हे गवळी राजे होते,त्यांचेकडे भरपूर पशुधन होते.बागलाणचा ३२ वा नानदेव बागुल राजाने या गवळी राजाला पराभूत केले,कालांतराने मोघलांनी या किल्ल्यावरील धनसंपदा हत्ती,घोडे ताब्यात घेवून किल्ल्याचा ताबा घेतला.निजामाच्या नंतर पेशवे,होळकर यांचे नंतर इंग्रजांनी पिसोळ गडचा ताबा घेतला होता.अश्या काही इतिहासाच्या संदर्भाने या किल्ल्याला ओळख आहे.किल्ल्याचे भव्य पठार विस्तार लाभलेल्या किल्ले पिसोळगड आहे,किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिसोळ वाडीतून निमुळत्या रस्त्याने पायथ्याला असलेल्या शिवकालीन हनुमानाच्या चौथऱ्या पासून अत्यंत शिस्तबद्ध पद्धत्तीने किल्ल्यावर निमुळत्या रस्त्याने चढाई करण्यात आली.यावेळी रस्त्यातील अस्ताव्यस्त पडलेली दगडे व्यवस्थित लावण्यात आली.घसरत्या वाटाना खाचरे खोदुन मार्ग करण्यात आला. पावसाच्या सरीत भिजत,दाट धुक्यात किल्ला चढाई रांगेत करण्यात आली.किल्ल्यावरील दगडात कोरलेल्या टाक्यांची पाहणी,मोजणी केल्यावर भुयारी सात महादेव नंदी टाक्याची पाहणी करण्यात आली,यातील २ टाके ढासळली आहे.तर रस्त्याने दिसणारी १२ फुटी रुंदीची दोन पदराची तटबंदी व त्याला मध्ये असलेले भव्य खंदक त्याची ठिकठिकाणी झालेल्या पडझडीमुळे,बुरुजे ढासळत असल्याने कोरीव दगडी चिरे अस्ताव्यस्त पडलेली आढळली.किल्ल्यावरील कडेलोट,धोकेदायक अर्धवट पडक्या अवस्थेत असलेला भव्य दरवाजा,आणि त्याच्या बाजूला असलेल्या वाड्यातील भिंतींवर विकृतानी केलेले विद्रुपीकरण,वाड्यात झालेली घाण, किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावरील वनराई,रंगीबेरंगी फुले,झाडे,त्यात दडलेल्या मोडकळीस आलेल्या पूर्वजांच्या,वीरांच्या समाध्यांची स्थिती हि दयनीय आहे.चिरे गेलेल्या ३ समाधी, झाडा झुडात दडलेल्या समाध्या,त्यावरील कोरीव काम,महादेवाचे लिंग,पावले,अश्या अनेक वास्तू आज जीर्नोध्दार,दुरुस्तीच्या संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे.एकूणच किल्ल्याकडे सर्वच पातळीवर दुर्लक्ष्य असल्याने किल्ल्याकडे असेच दुर्लक्ष्य केल्यास हा वारसा नष्ट होऊ शकतो,याकामी आता समाजाने लक्ष्य घालावे,दुर्गसंवर्धन क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्रातील अनेक कष्टाळू मोहिमांचे कार्य,कष्ट सामाजिक,शाशकीय पातळीवर अत्यंत दुर्लक्षित आहे.केंद्र व राज्य शासन एकीकडे किल्ल्यांच्या संवर्धनाकडे कायम दुर्लक्ष्य करीत आले आहे.दुसरीकडे ज्या गडसंवर्धन मोहिमा आहेत त्यांना हि शासन,समाज मदत करीत नाही हे दुर्दैव आहे,आम्ही राबणारे दुर्गभक्त आमच्याशी कमीत कमी शासनाने संवाद करावा.आमचे म्हणणे समजून घ्यावे मात्र आंधळे बहिरे बनलेले सत्ताधारी,प्रशासन शिवशंभू राज्यांच्या मूर्तिमंत स्मारके असलेल्या गड दुर्गांकडे अक्ष्यम्यपणे दुर्लक्ष्य करीत आहे असे यावेळी गडसंवर्धक बैठकीत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी आपली भावना व्यक्त केली.यावेळी बाल दुर्गसंवर्धक रेणू भानोसे हिचा संस्थेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. किल्ले पिसोळगड श्रमदान मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,निमंत्रक प्रा.सोमनाथ मुठाळ,मानद सल्लागार संदीप भानोसे,कोषाध्यक्ष डॉ.अजय कापडणीस,मावळा प्रतिष्टान चे बजरंग पवार,युवराज पवार,सल्लागार समितीचे गजानन दिपके,मोडी भाषा अभ्यासक आर.आर.कुलकर्णी,शाम कुलथे,कृष्णकांत विसपुते,राजेंद्र कट्यारे,डॉ.राजेंद्र ब्राम्हने,नंदकुमार कापसे,प्रमोद पवार,गोरख मोहिते,गणेश सोनवणे,आकाश सावकार,हेमंत भावसार,योगेश जाधव,गणेश खैरनार,प्रमोद पवार,राहुल भोसले,संकेत भानोसे,बाल दुर्गसंवर्धक रेनुताई प्रथमेश दिपके,कृष्ण भावसार,यासह अनेक गडसंवर्धक सहभागी झाले होते.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व मावळा प्रतिष्टान या मित्र संस्थांच्या संयुक्तपणे किल्ले पिसोळगड गडश्रमदान मोहिमेत सहभागी दुर्गमित्र

किल्ल्यावर श्रमदान करताना

किल्ल्यावरील ऐतिहासिक दरवाजा व भग्न वाडा

किल्ल्यावरील “भुताचे झाड” म्हणणारा वृक्ष

राम खुर्दळ, (संस्थापक) शिवकार्य गडकोट संस्था. नाशिक जिल्हा. मो.९३७१५२७५०१


गडकोट पर्यावरण, पशुपक्षी, वनौषधी, जल व ईतिहासाची अभ्यासकेंद्रे व्हावीत

दुर्गजागृती व्याख्यानमालेत नाशिकला शिवाजी गाडे यांचे आवाहन

नाशिक प्रतिनिधी: गडकिल्ल्यांकडे बघण्याची दृष्टी आता व्यापक करू या, गडकोट इतिहासाने भारलेले धारातीर्थे आहेत,त्यासोबत दुर्ग हे वनौषधी,पशुपक्षी,फुले,फळे,शारीरिक स्थैर्य,संतुलन,व ईतिहास अभ्यासाची केंद्रे बनावीत,ज्ञान व इतिहास या दोन्ही गोष्टी वसुंधरेच्या दृष्टीने अधिक मौल्यवान आहेत,छत्रपती शिवशंभू व त्यांच्या शूर मावळ्यांनी घडवलेले स्वराज्य व स्वातंत्र्य काय असते याचे एकमेव मूर्तिमंत स्थान हेच गडकोट आहेत.गडकोटांची दैना आपल्याच दुर्लक्षयामुळे झाल्याने हे दुर्गसंवर्धन जतन ही आपली जितकी तितकीच गडांच्या पायथ्याच्या गावांची जबाबदारी आहे,आता दुर्गसंवर्धन कार्य हे गडांच्या पायथ्याच्या गावाना सोबत घेऊन करायला हवे असे आवाहन दुर्गजागृत्ती व्याख्यानमालेत संभाजीनगर पैठण दिव्यांग दुर्गसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी नाशिक येथे (दि १२ ऑगष्ट 2017) केले.
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकला अखंड दुर्गजागृती व्याख्यानमाला सुरू आहे,या व्याख्यानमालेचे 18 वे पुष्पात पैठण दिव्यांग दुर्गमोहिमेचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी “दुर्गांचे अवशेष व दुर्गसंवर्धन”या विषयावर व्याख्यान केले.नाशिकच्या भाभानगर वीर स्वा.विनायक दामोदर सावरकर हॉल मध्ये हे दुर्गजागृत्ती व्याख्यान झाले.व्याख्यानात वक्ते शिवाजी गाडे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला,गडकिल्ल्यांच्या नुकसानीला जबाबदार असलेल्या समाजाने किल्ल्यांचे संवर्धन संरक्षण केले पाहिजे.शिवकार्य गडकोट सारख्या केवळ बोटावर मोजता येतील इतक्या संस्था दुर्गांवर राबतात,दुर्गजागृत्ती करतात,आजच्या काळात हीच खरी शिवभक्ती आहे.प्रतिकूल स्थितित दुर्गसंवर्धन करणारे हात समाजातील सर्वांनी मजबूत केले पाहिजे. पण दुर्दैव समाजातील संवेदना दिवसेंदिवस हरवत असताना किल्ले संवर्धनाचे व्रत सतीच वाण समजून करा.किल्ल्यांची दिवसेंदिवस नष्ट भग्न होणारी स्थिती बघता येथील व्यवस्थेकडे डोळस वृत्ती नाही आता ही रयतेची संपत्ती समजून गडकोटांची दैना बदला.त्यांना ज्ञानाचे विद्यापीठे करा,यातून देशात देशभक्ती असणारे नेतृत्व घडेल असे आवाहन त्यांनी व्याख्यानाच्या शेवटी केले.यावेळी गोदावरी स्वच्छता चळवळीतील निशिकांत पगारे, शिवकार्य गडकोट संस्थेचे अध्यक्ष राम खुर्दळ,संयोजक योगेश कापसे ,मानद सल्लागार डॉ संदीप भानोसे, प्रा.सोमनाथ मूठाळ,डॉ अजय कापडणीस,यशवंत धांडे,कृष्णचंद्र विसपुते,प्रमोद चव्हाण,कचरू वैद्य,दिलीप सोनार,निवृत्ती घोलप,अविनाश क्षीरसागर,संकेत भानोसे,मनोज अहिरे,उपस्थित होते.
फोटो ओळी: शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या नाशिकला झालेल्या  दुर्गजागृती व्याख्यानमालेत 18 वे पुष्प “गडकोटांवरील अवशेष व संवर्धन”या विषयावर व्याख्यान देतांना संभाजीनगर पैठण दिव्यांग दुर्गमोहिमेचे प्रमुख शिवाजी गाडे..

राम खुर्दळ, संस्थापक – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक जिल्हा, मो.९४२३०५५८०१


भर पावसात दुंधा किल्ल्यावर शिवकार्य गडकोटचे श्रमदान.

शिवकार्य गडकोटच्या सुवर्णमोहोत्सवी मोहिमेत “मी राबेल दुर्गांच्या अस्तित्वासाठी” असा संकल्प

दिनांक २४ जुलै २०१७

नाशिक प्रतिनिधी: शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ५० वी सुवर्णमोहोत्सवी गडकोट श्रमदान मोहिम (दि.२३ जुलै २०१७ रोजी ) मालेगाव तालुक्यातील दुंधा किल्ल्यावर झाली.सह्याद्रीच्या पश्चिमेस असलेल्या दुंधा किल्ल्यावर दिवसभर सुरु असलेल्या भर पावसात गडकोट संवर्धकानी श्रमदान केले.किल्ल्याच्या पायथ्याला भामेश्वर महाराजांच समाधी मंदिर,प्राचीन षटकोनी बारव,पायवाटेची चढाई,त्यात कातीव कड्यांवर आढळणाऱ्या दगडी पायऱ्या,झाडाझुडांत वेढलेला, बहुतांशी काटेरी साबरांत दडलेला,पडके नावालाच उरलेली तटबंदी,किल्ल्यावरील कोरीव जलाशये,पुरातन दुन्धेश्वर महादेवाचे मंदिर त्यातील ताम्रआच्छादित नंदी,पिंड,त्यामागील गोरख चिंचाची २ भव्य झाडे,चुन्याची घळ.किल्ल्यावरील बहुतांशी असलेले पाण्याचे कोरीव टाके अश्या ऐतिहाशिक,आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाच्या दुंधा किल्ल्यावर श्रमदानानंतर उपस्थित गड संवर्धकांनी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या सुवर्णमोहोत्सवी मोहिमेप्रसंगी “मी राबेल दुर्गांच्या अस्तित्वासाठी” असा एकमुखी संकल्प केला.

पहाटे ६ वाजता नाशिकच्या कोर्टासमोरअसलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर”किल्ले वाचवा महाराष्ट्राचा इतिहास वाचवा”अश्या घोषणा देत  शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या ५० व्या मोहिमेचे प्रस्थान  झाले.देवलाने सटाणा या गावातील हजारो वर्षाचा इतिहास लाभलेल्या हेमांडपंथी महादेव मंदिराची पाहणी केली,या कोरीव मंदिराची रचना खूप मोठा ऐतिहासिक ठेवा आहे,कोरीव मुर्त्या आणि मंदिराचा परिसर रम्य आहे ,तेथून थेट दुन्धा गडावर संवर्धक चढाईनन्तर किल्ल्यावरील पूर्णपणे बुजलेल्या,तसेच वाळलेल्या काटेरी साबरात दबलेल्या दोन दगडी कोरीव टाक्यांतील वाळलेले काटेरी साबरे काढले ,टाक्यांतील माती दगडे अभ्यासपूर्ण पध्दतिने काढली,याच टाक्याला लागून काटेरी साबरात गडप,लुप्त,पूर्ण बुजलेल्या झालेल्या टप्प्याच्या टाक्यातील माती,दगडे काढून टाक्याची एक बाजू दीडफुट मोकळी केली. किल्ल्यावरील देवटाके,अंघोळीचे टाके,शेवाळटाके,पिंपळटाके अश्या टाक्यांची गडसंवर्धकानी पाहणी केली.या टाक्यांची मोजमापे,पेंशील स्केच तयार करण्यात आले.किल्ल्याची एकूण रचना बघता दुंधा गड हा आजूबाजूच्या देवस्थानावर,परिसरावर टेहाळणी साठी निर्मिलेला दुर्ग आहे असा उल्लेख अनेक पुस्तकात आढळतो,तर किल्ल्यावरील दुंधेश्वराचे जुने देवस्थान,भामेश्वर महाराजांची तापोभूमिच्या हया किल्ल्यावर श्रावणात उत्सव असतो ,भाविकांची गडफेरी असते.दुंधा किल्ल्यावर कुठलीही विकासकामे झालेली नाहीत,या पूर्वी झालेल्या निधी चा विनियोग योग्य झाला नसल्याचे आढळले.

दरम्यान शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था श्रमदानाच्या बळावर ६ वर्षे नाशिक जिल्ह्यातील दुर्लक्षित किल्ल्यावर अखंड मोहिमा राबवीत आहे. ६ वर्षे सुरु असलेल्या या चळवळीने गड संवर्धनाचा ५० वा टप्पा गाठला आहे त्या निमित्ताने दुंधा किल्ल्याच्या पायथ्याला झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम खुर्दळ यांनी संस्थेचा खडतर प्रवास मांडला अत्यंत निस्पृहभावनेतून स्व-खर्चातून सुरु असलेल्या मोहिमा,दुर्गांची तळागाळात केलेली जागृती,मोहिमा राबवीत असताना कष्टाळू निष्ठावंत श्रमदान करणाऱ्यां गडकोट संवर्धकांचे ऋण मांडले,संस्थेला येणाऱ्या अडचणी,संकटे त्यातून सुरु ठेवलेले हे व्रतस्त कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली,या वेळी सामुदायिक संवाद झाला.मानद सल्लागार डॉ.भानोसे यांनी संस्थेसाठी आता सर्वांनी झटावे,शिवकार्य गडकोट सारख्या अत्यंत प्रामाणिक राबणाऱ्या संस्थेच्या भविष्यासाठी,कार्यासाठी समाजाने शास्वत कार्यासाठी संस्थेला तन,मन,धन अर्पून मदत करावी,साधनांच्या रूपाने सहाय्य करण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थित दुर्गमित्रांनी दुर्गगानी गायन केले.संस्थेच्या कार्यात झटण्याचा,मोहिमा व संस्थेच्या कार्यात अधिक वेळ देण्याचा शब्द दिला.मावळा प्रतिष्टान ने केलेल्या अनेक श्रमदानातील कामांची माहिती यावेळी बजरंग पवार,युवराज पवार,गोरख मोहिते यांनी या प्रसंगी दिली. या सुवर्णमोहोत्सवी मोहिमेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम खुर्दळ,निमंत्रक सोमनाथ मुठाळ,किल्ला ऐतिहासिक वास्तू मोजमाप समितीचे डॉ.अजय कापडणीस,मानद सल्लागार डॉ.संदीप भानोसे,पर्यावरण समितीचे यशवंत धांडे,राजेंद्र कट्यारे,कृष्णचंद्र विसपुते,श्रमदान साहित्य समितीचे राहुल भोसले,गणेश सोनवणे,प्रमोद चव्हाण,मनोज अहिरे,गजानन दिपके,रतनकुमार भावसार,श्रमदान समितीचे संकेत भानोसे,डॉ.भारत ब्राह्मणे,अविनाश क्षीरसागर,दिव्यांग दुर्गसंवर्धक सागर बोडके,रेणूताई भानोसे,सारंग शिंदे,मावळा प्रतिष्टान चे युवराज पवार,गोरख मोहिते इत्यादी मोहिमेत सहभागी झाले होते.

राम खुर्दळ, संस्थापक – शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक जिल्हा, मो.९४२३०५५८०१